Sunday 24 April 2016

शाळेचे उपक्रम व्हिडीओ

वरील शाळेचे उपक्रम वर क्लिक करून २०१५-१६ चा जि प प्रा शाळा भाटशिरपुरा शाळेचा व्हिडीओ पाहू शकता

शाळेचे उपक्रम

जि प प्रा शाळा भाटशिरपुरा
 उपक्रम व्हिडीओ २०१५-१६  लिंक

https://www.youtube.com/watch?v=i0zeWW6Wrbg


Saturday 26 December 2015

Sunday 2 August 2015

माझा विद्यार्थी अक्षय याने काढलेली चित्रे


५वी चा विद्यार्थी अक्षय अडगळे याने काढलेली चित्रे


Sunday 5 July 2015

उपक्रम - शाळेची रोपवाटिका







उपक्रम - शाळेची रोपवाटिका 
जि प प्रा शाळा भाटशिरपुरा शाळेतील ५ वी ते ७ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २४ जून २०१५  रोजी रोप लावण्यासाठी एक पिशवी व बियांचे वाटप करण्यात आले. जो विद्यार्थी या बियांची योग्य प्रकारे काळजी घेऊन , रोपांची चांगल्या प्रकारे वाढ करेल, त्या विद्यार्थ्याला योग्य बक्षीस देऊन त्याचा सत्कार करण्यात येईल.
तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या बिया उगवणार नाहीत , त्यांनी चिंच , लिंब , गुलाब किंवा परिसरातील उपलब्ध इतर बियांची लागवड करावी. ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वांनी रोपांच्या दिलेल्या पिशविसह हजार रहावे किंवा चांगला पाऊस पडल्यानंतर शाळेच्या परिसरात या रोपांची लागवड करावयाची आहे.

उपक्रमाचे फायदे
१ ) विद्यार्थ्यांना आपण लावलेल्या रोपाविषयी जिव्हाळा निर्माण होतो.
2) सजीव व निर्जीव यांची लक्षणे समजतात.
3) वृक्षसंगोपनाचे महत्त्व समजते.
4) वनस्पती वाढ या विषयी अनुभवातून शिकतो .
५) परीसरातील वाढणाऱ्या वनस्पतीची माहिती गोळा करतो
६) कमी खर्चामध्ये शाळेची रोपवाटिका तयार होते.